इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय …?
What is input Output Devices In Marathi..
आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की संगणकाच्या इनपुट उपकरणे आणि आउटपुट उपकरणे कशी असतात (What is input Output Devices In Marathi) आणि ती कोणती आहेत. चला तर मग पाहूया, संगणकाचे इनपुट आणि आउटपुट उपकरणे म्हणजे काय.? What is input Output Devices In Marathi
संगणक चालवण्यासाठी इनपुट आणि आउटपुट उपकरणे आवश्यक असतात. त्यांनाच आपण उपकरणे असेही म्हणतो. ज्याच्या साहाय्याने आपण एखादी कृती किंवा ॲक्शन करतो, त्याला इनपुट उपकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्याला टायपिंग करायचे असल्यास किंवा कर्सर हलवायचा असल्यास, कीबोर्ड आणि माऊसचा वापर करावा लागतो. आणि ज्यावर आपल्याला हे सर्व काही दिसते, त्याला आउटपुट उपकरण म्हणतात. जसे की, मॉनिटर. मॉनिटर आपल्याला निकाल दाखवण्याचे काम करते, ज्यावर आपल्याला सर्व काही पिक्सलच्या सहाय्याने दिसत असते.
संगणकाला सूचना देण्यासाठी दोन सर्वात महत्त्वाचे इनपुट घटक म्हणजे कीबोर्ड आणि माऊस. आणि ज्यावर आपल्याला निकाल दिसतो, त्या आउटपुट उपकरणाला आपण मॉनिटर असे म्हणतो. हे बेसिक इनपुट-आउटपुट उपकरणे आहेत, जे संगणकाचे महत्त्वाचे भाग आहेत. परंतु, याचबरोबर इतरही अनेक इनपुट आणि आउटपुट उपकरणे असतात, ज्यांचा वापर करून आपण संगणक अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि मोठ्या प्रमाणात काम करू शकतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला प्रिंट काढायची आहे, तर आपल्याला आउटपुट उपकरणाचा वापर करावा लागतो, तो म्हणजे प्रिंटर, ज्याच्या साहाय्याने आपण प्रिंट काढू शकतो.
आज आपण या लेखात अशाच प्रकारचे इनपुट आणि आऊटपुट उपकरणे, तसेच इनपुट-आऊटपुट दोन्ही प्रकारची उपकरणे यांची यादी पाहणार आहोत.
इनपुट डिव्हाइस :
संगणकाला ज्या साधनांच्या माध्यमातून माहिती किंवा आज्ञा दिली जाते, त्या साधनांना ‘इनपुट डिव्हाइस’ असे म्हणतात. इनपुट डिव्हाइस म्हणजे असे साधन जे संगणकाला इनपुट प्रदान करते. यामध्ये सर्वसामान्यपणे कीबोर्ड आणि माउस यांचा समावेश होतो. आपण कीबोर्डवर दाबलेली प्रत्येक की किंवा माउसद्वारे केलेली प्रत्येक क्लिक संगणकाला एक विशिष्ट इनपुट सिग्नल पाठवते. जेव्हा आपण संगणकात माहिती प्रविष्ट करता, तेव्हा ती माहिती ‘इनपुट’ म्हणून ओळखली जाते. हे वर्ड प्रोसेसिंग दस्तऐवजात टाइप केलेला मजकूर असो, शोध इंजिनातील शोध बॉक्समध्ये प्रविष्ट केलेले शब्द असोत किंवा स्प्रेडशीटमध्ये भरलेला डेटा असो.
कीबोर्ड, माउस, स्कॅनर, आणि डिजिटल कॅमेरा यांसारखी उपकरणे इनपुट साधने म्हणून ओळखली जातात. इनपुट डिव्हाइस म्हणजे असे कोणतेही हार्डवेअर उपकरण, जे संगणकाला डेटा पाठवते आणि आपल्याला संगणकाशी संवाद साधण्यास व नियंत्रित करण्यास सक्षम करते. संगणकावर सर्वसामान्यपणे वापरली जाणारी किंवा प्राथमिक इनपुट साधने म्हणजे कीबोर्ड आणि माउस; तथापि, संगणकात डेटा इनपुट करण्यासाठी इतर उपकरणेही वापरली जातात.
Input Devices :
- Graphics Tablets
- Video Capture Hardware
- Trackballs
- Barcode reader
- Digital camera
- MIDI keyboard
- Gamepad
- Joystick
- Keyboard
- Cameras
- Microphone
- Mouse (pointing device)
- Scanner
- Webcam
- Touchpad’s
- Microphone
- Electronic Whiteboard
- OMR
- OCR
- Pen Input
- Punch card reader
- MICR (Magnetic Ink character reader)
- Magnetic Tape Drive
आउटपुट डिव्हाइस :
संगणकाला दिलेल्या माहितीच्या आधारावर ते प्रक्रिया करून जी माहिती आपल्याला एखाद्या साधनाद्वारे ( ध्वनी,प्रतिमा , शब्द आणि कृती ) सादर करतो त्याला आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात.संगणकावर निकाल मिळवण्यासाठी आउटपुट उपकरणे खूप महत्त्वाची असतात. म्हणजेच, इनपुट उपकरणांद्वारे जी माहिती किंवा आज्ञा दिली जाते, त्यावर प्रक्रिया करून आपल्याला आवश्यक निकाल मिळतो आणि त्यासाठी आउटपुट उपकरणांची आवश्यकता भासते.
उदाहरणार्थ, आपण काही टायपिंग करत असतो आणि ते टायप केलेले आपले सॉफ्ट कॉपीतील डेटा हार्ड कॉपीमध्ये हवा असल्यास, त्यासाठी प्रिंटरची आवश्यकता असते. म्हणून, संगणकाला प्रिंटर हे आउटपुट उपकरण जोडणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आपल्याला आवश्यक तो निकाल मिळतो.
सर्वात महत्त्वाचे आणि जास्त वापरले जाणारे आउटपुट उपकरण म्हणजे मॉनिटर. याच्या सहाय्याने, आपण माउस किंवा कीबोर्ड वापरून केलेल्या सर्व क्रियांबद्दलचा निकाल मॉनिटरवर पाहता येतो. खाली आपण संगणक हाताळण्यास सोपी बनवणाऱ्या इतर आउटपुट उपकरणांची माहिती पाहणार आहोत.
Output Devices :
- LCD Projection Panels
- Monitor (LED, LCD, CRT etc)
- Printers (all types)
- Plotters
- Microfiche
- Projector
- Head Phone
- Computer Output Microfilm (COM)
- Speaker(s)
- Visual Display Unit
- Film Recorder
Both Input–Output Devices:
जे उपकरणे दोन्ही प्रकारचे कार्य करतात, म्हणजेच इनपुटसुद्धा देतात आणि आउटपुटसुद्धा करतात, त्यांना ‘Both इनपुट-आउटपुट उपकरणे’ असे म्हणतात. उदाहरणार्थ, झेरॉक्स मशीन. झेरॉक्स मशीन ऑपरेटर आपल्या दिलेल्या पृष्ठाचे स्कॅनिंग करतो, आणि त्यानंतर त्याच झेरॉक्स मशीनमधून प्रिंटआउट मिळतो. म्हणजेच, एकाच वेळी इनपुटसुद्धा घेतले जाते आणि आउटपुटसुद्धा दिला जातो. या दोन्ही क्रिया होत असल्याने याला ‘Both इनपुट-आउटपुट उपकरण’ असे म्हणतात.
- Touch Screen
- Modems
- Network cards
- Audio Cards
- Headsets (Headset consists of Speakers and Microphone.
- FAX Machine
या लेखात आपण संगणकाचे इनपुट उपकरणे आणि आउटपुट उपकरणे, कशी कार्य करते, तसेच तिचे प्रकार कोणते आहेत हे माहिती पाहिले. मला आशा आहे की तुम्हाला या विषयाची संपूर्ण माहिती मिळाली असेल. लवकरच नव्या विषयासह भेटू, धन्यवाद !
जर या लेखासंबंधी काही अडचणी किंवा शंका असतील, तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावे. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. हा लेख तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमचे मत कमेंटद्वारे कळवायला विसरू नका !