what is input devices in marathi with Examples
what is input devices ?कॉम्प्युटरचा वापर करत असताना कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठी इनपुट डिव्हाइस चा वापर केला जातो. कीबोर्ड माऊस हे इनपुट डिवाइस मधील महत्त्वाचे घटक आहेत पण त्याचबरोबर बायोमेट्रिक मशीन, माईक स्क्रीन यासारखे डिवाइस इनपुट डिवाइस म्हणून काम करत असतात. या लेख मध्ये आपण काही इनपुट डिवाइस बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
what is input devices ..?
की-बोर्ड :
की-बोर्ड हे सर्वात महत्त्वाचे इनपुट डिवाइस आहे. याद्वारे कम्प्युटरमध्ये माहिती भरली जाते. हे टाईपरायटर प्रमाणे काम करते. याद्वारे बऱ्याच प्रकारचे शब्द ,संख्या ,चिन्ह हे टाईप केले जाते. संगणकामध्ये इनपुट करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे डिवाइस म्हणजे कीबोर्ड आहे अंक अक्षरे आणि विविध चिन्हाचा वापर हा कीबोर्डच्या सहाय्याने संगणक केला जातो.
की बोर्ड हे इनपुट डिवाइस म्हणून कार्य करतो कम्प्युटरला माहिती कम्प्युटरच्या भाषेत रूपांतरण करण्यासाठी कीबोर्ड द्वारे इनपुट होत असते. कीबोर्ड वरील KEY संख्या वेगवेगळे असू शकते 101 किंवा 114 की 108 की बोर्ड वरती असतात. अलीकडे वायरलेस कीबोर्ड सुद्धा उपलब्ध झालेले आहेत.” QWERTY” हे लेआउट सर्वाधिक वापरले जाणारे कीबोर्ड लेआउट आहे.
आपण “QWERTY” नावे कीबोर्डच्या पहिल्या ओळीमध्ये आपण पाहू शकतो, कीबोर्ड चा वापर हा टायपिंग साठीच केला जातो असे नाही तर गेमिंग साठी प्रोग्रामिंग साठी व इतर सॉफ्टवेअर हँडल करण्यासाठी ही कीबोर्ड चा वापर केला जातो. कीबोर्ड हे विविध प्रकारात दिसून येत आहेत, मोठ्या आकारापासून ते छोट्याआकार पर्यंत कीबोर्ड बाजार मध्ये मिळतात, कीबोर्डची पण काही प्रकार असतात ट्रॅडिशनल कीबोर्ड ,लवचिक कीबोर्ड, वायरलेस कीबोर्ड, हे असे काही प्रकार आहेत, सर्वसाधारणपणे कीबोर्ड मध्ये 101 ते 114 पर्यंत keys दिलेल्या असतात.
Keybaord बद्दल अधिक माहिती वाचा >>What is computer keyboard? Complete information in Marathi
माऊस:
माऊस हे एक प्रकारचे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. याचा वापर टेक्स्ट मध्ये त्याची पोझिशन दर्शवण्यासाठी केला जातो. या पॉइंटरला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर ती नेण्यासाठी वापर केला जातो. याच्या व्यतिरिक्त माऊसचा वापर कम्प्युटरमध्ये ग्राफिक्स चे मदत करण्यासाठी केला जातो.
माऊसचा शोध 1963 मध्ये स्टॅन्ड फोर्ड रिसर्च सेंटर मध्ये डग्लर्स यांनी केला होता यामध्ये सामान्यतः दोन किंवा तीन बटन असतात एक बटन जो डाव्या साईडला आणि दुसरे बटन उजव्या साईडला असतात दोघांच्या मध्ये एक स्क्रोल व्हील असते ज्याचा वापर कोणत्याही फाईलला वरती किंवा खाली आणण्यासाठी केला जातो.
माऊसचे साधारणतः तीन प्रकार असतात
1. वायरलेस माऊस
2. मेकॅनिकल माऊस
3. ऑप्टिकल माऊस
बारकोड रीडर :
बारकोड रीडर हे एक इनपुट डिवाइस आहे त्याचा प्रयोग कोणत्याही उत्पादन वर असलेल्या बारकोड (युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड) ला वाचण्यासाठी केला जातो. बारकोड काय आहे त्याचा वापर कोणत्या पद्धतीने करण्यात येतो याची माहिती आपण आज बघणार आहोत .बारकोड रीडर हे प्रकाशाच्या किरणांवर आधारित आहे.
जेव्हा हे किरण बारकोड इमेज वर पडतात तेव्हा बारकोड रीडर मध्ये लाईट सेन्सिटिव्ह डिटेक्टर असतो जो बारकोड इमेज ला दोन्ही बाजूंनी ओळखतो. जेव्हा हे बारकोड रीडर ओळखल्यानंतर त्यामध्ये सांख्यिकी कोड मध्ये परिवर्तित केला जातो. बारकोड रीडरचा जास्तीत जास्त वापर हा सुपर मार्केटमध्ये केला जातो जिथे बारकोड रीडर द्वारा अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही वस्तूचे मूल्य वाचले जाऊ शकते.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बारकोड रीडर हे एक असे उपकरण आहे जे त्यामध्ये असलेली माहिती वाचण्यासाठी वापरले जाते आणि हे वाचन लेझर बीम स्कॅनर च्या साह्याने केले जाते आणि ते संगणकाला जोडलेले असते. आपण बऱ्याच दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघत असतो.
तिथे बारकोड चा वापर करण्यात येत असतो. जसे की पुस्तकांच्या दुकानात छापील पुस्तकांची विक्री करण्यासाठी त्यांना बारकोड ची आवश्यकता असते. बारकोड सिस्टीमचा वापर केल्यामुळे त्यांना मशीन रीड करण्याची परवानगी देते आणि स्वयंचलित विक्री ची सुविधा देण्यात येते .बऱ्याच मोठमोठ्या दुकानांमध्ये विक्रेत्यांसाठी ही आवश्यक गोष्ट मानली जाते. मोठमोठ्या मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये प्रत्येक वस्तूंवर बारकोड सिस्टीमचा वापर केलेला आपल्याला दिसून येत असतो.
यामुळे काय होते तर जर एखादी वस्तू आपण घेतली तर ती स्कॅन केल्यावर त्याची किंमत आपल्याला लगेच समजते म्हणजेच ऑपरेटरच्या डेस्कटॉपवर ते आपल्याला बघायला मिळते. बारकोड कसे असते तर बारकोड मध्ये उभ्या रेषांची रचना केलेली असते आणि त्याखाली अंक लिहिलेले असतात यामध्ये बऱ्याच प्रकारची माहिती आपण जाणून घेऊ शकतो. बारकोड सिस्टीम वर बराच अभ्यास केल्याच्या नंतर संपूर्णपणे हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आजकाल बऱ्याच स्वरूपात हे उपलब्ध झाले आहेत आणि ते आपण मोबाईल वरून देखील वाचू किंवा स्कॅन करू शकतो
ऑप्टिकल मार्क रीडर :
ऑप्टिकल मार्क रीडर हे एक प्रकारचे इनपुट डिवाइस आहे त्याचा वापर एखाद्या कागदावर बनवण्यात आलेल्या चिन्हांना ओळखण्यासाठी केला जातो हे कागदावर लेझर राईट सोडतात आणि हे लेझर लाईट ज्या चिन्हांवर पडतात त्या चिन्हाला ऑप्टिकल मार्क रीडर (OMR)करून कम्प्युटरला इनपुट देतो. ऑप्टिकल मार्क रीडर चा वापर करून वस्तुनिष्ठ प्रश्न यांच्या उत्तर सूची बनवण्यात येतात याचा वापर करून हजारो प्रश्नांचे उत्तरे कमीत कमी वेळ घेऊन ओळखता येतात.
Optical character recognition :
हे ओ एम आर (OMR) चे दुसरे रूप आहे. हे केवळ साधारण चिन्हांनाच नाही तर हाताने लिहिलेल्या अक्षरांना सुद्धा वाचू शकतो. हे प्रकाश स्रोत च्या मदतीने कॅरेक्टर च्या शेपला ओळखू शकतो. या पद्धतीलाच ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन असे म्हटले जाते. याचा वापर अनेक अनुप्रयोग जसे की टेलिफोन इलेक्ट्रिसिटी बिल विमा प्रीमियम आदी साठी केला .जातो ओ सी आर (OCR)च्या अक्षरांना वाचण्याची गती 1500 ते 3000 कॅरेक्टर प्रति सेकंड एवढी असते.
Magnetic ink character reader (MICR):
MICR चा आकार परीक्षण मॅट्रिक्स च्या रूपावर आधारित आहे त्यानंतर ते वाचले जाते आणि वाचल्यानंतर त्या सूचना कम्प्युटरला पाठवल्या जातात. सूचनांमध्ये कॅरेक्टर हे एका विशेष एक मध्ये छापलेले असतात ज्यामध्येआयरण कण (iron particles) असतात. त्याने मॅग्नेटाइज (magnetise) करू शकतो. या प्रकारच्या शाहीला चुंबकीय शाही असे म्हणतात याचा वापर बँकेमध्ये चेकच्या खाली लपलेल्या मॅग्नेटिक एन्कोडींग च्या संख्यांना ओळखण्यासाठी केला जातो आणि त्यावर प्रोसेस करण्यासाठी केला जातो.
बायोमेट्रिक सेन्सर :
बायोमेट्रिक सेंसर हे एक प्रकारचे डिवाइस आहे त्याचा वापर कोणत्याही व्यक्तीच्या अंगठ्यांचे ठसे ओळखण्यासाठी केला जातो. बायोमेट्रिक सेंसर चा मुख्य उद्देश सुरक्षा हाच असतो याचा वापर शाळेमध्ये किंवा कॉलेज ,ऑफिस या ठिकाणी त्यांचे उपस्थिती घेण्यासाठी केला जातो.
बायोमेट्रिकचा सेन्सर चा वापर हा मानवी शरीरामध्ये काही भाग म्हणजेच फिंगरप्रिंट डोळ्याचा पडदा चेहऱ्याचा आकार असे स्कॅन करून रिझल्ट देत असतो. सेन्सरची पण वेगवेगळे प्रकार असू शकतात यामध्ये फेस सेंसर -त्यामध्ये चेहऱ्याचा आकार मांडणे डोळे नाक यानुसार ओळख पटवली जात असते. आई सेंसर -डोळ्याच्या पडद्याचे फोटो वरून त्याची ओळख पटवली जाते. फिंगरप्रिंट सेंसर – बोटाच्या ठश्या घेऊन त्या ठसेद्वारे ओळख पटवली जाते.
आजकाल आपण बघतो सेंसर चा वापर हा सुरक्षिततेसाठी जास्त प्रमाणामध्ये केला जातो जसे की आता आपण मोबाईल वापरतो आणि त्या मोबाईल मध्ये फोन अनलॉक करण्यासाठी आपण फिंगरप्रिंट चा वापर करतो त्याचबरोबर फेस स्कॅनरचाही आपण वापर करतो
स्कॅनर :
स्कॅनर चा वापर पेपर वर लिहिलेल्या माहिती किंवा चित्र यांना डिजिटल रूपामध्ये परिवर्तित करण्यासाठी केला जातो. हे एक ऑप्टिकल इनपुट डिवाइस आहे जो इमेज ला इलेक्ट्रॉनिक image मध्ये बदलण्यासाठी प्रकाश किरणांना इनपुटच्या पद्धतीने वापर करतो आणि त्या चित्रांना डिजिटल रूप मध्ये बदलण्यासाठी कम्प्युटरला पाठवतो. स्कॅनर चा प्रयोग काही डॉक्युमेंट्सला स्टोअर करण्यासाठी केला जातो ज्याच्या मदतीने ते त्यामध्ये बदल करू शकतात.
जेव्हा एखादा कागद आपण स्कॅनर मध्ये ठेवतो त्यावर तो स्कॅन करण्यासाठी त्यामध्ये एक लाईट सोर्स असतो त्याला आपण लेझर ही असं म्हणू शकतो , जो कागद आपण त्यामध्ये ठेवला त्यावरती प्रकाश पडून त्याच्या रूपांतर हे डेटा मध्ये करून कम्प्युटरमध्ये सेव करण्याची कन्सेप्ट आहे या स्कॅनर मध्ये असते. आपण इमेज स्वरूपात डेटा कंप्यूटर मध्ये स्टोअर करू शकतो याला आपण सॉफ्ट कॉपी असे ही म्हणतो.
स्कॅनर चा वापर हा शक्यतो ऑफिसमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो पण शिक्षण विभागांमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर वैद्यकीय फोटोग्राफी , बँक अशा अनेक ठिकाणी आपण याचा वापर आपण करू शकतो ज्यामुळे डिजिटल स्वरूपात आपल्याला कम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करता कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम खूप जलद गतीने होत आहे.
स्कॅनर हे प्रमुख प्रकार
hand held scanner( हॅन्ड हेल्ड स्कॅनर)
Flatbed scanner (फ्लॅट बेड स्कॅनर)
drum scanner (ड्रम स्कॅनर)
मायक्रोफोन-माइक :
मायक्रोफोन हे एक प्रकारचे इनपुट डिवाइस आहे. त्याचा वापर कम्प्युटरच्या आवाजाला इनपुट करण्यासाठी केला जातो. मायक्रोफोन तो प्राप्त करतो आणि कम्प्युटर फॉर्मेट मध्ये परिवर्तन करतो, ज्याला डिजिटाइज्ड साऊंड किंवा डिजिटल ऑडिओ असे देखील म्हटले जाते.
मायक्रोफोन मध्ये आवाज डिजिटल रूपामध्ये परिवर्तित करण्यासाठी एक सहाय्यक हार्डवेअर ची आवश्यकता असते, या सहाय्यक हार्डवेअर ला साऊंड कार्ड असे म्हटले जाते. आज-काल मायक्रोफोन चा वापर स्पीच रिकग्नेशन सॉफ्टवेअर मध्ये देखील केला जातो अर्थात त्याची मदत कम्प्युटरमध्ये टाईप करण्यासाठी पडत नाही उलट चे बोलले जाते ते डॉक्युमेंट्स तयार केले जाते. मायक्रोफोन चा वापर हा संगणकाला जोडून वेगवेगळ्या पद्धतीचे गाणे ऐकण्यासाठी किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठीही होऊ शकतो, फोन कॉलिंग व्हिडिओ कॉल कॉन्फरन्सच्या वेळी मायक्रोफोन चा वापर हा खूप महत्त्वाचा असतो
Webcam or web camera :
वेबकॅम हे एक प्रकारचे व्हिडिओ कॅप्चरिंग डिवाइस आहे .हे एक डिजिटल कॅमेरा आहे ज्याला कम्प्युटर सोबत जोडले जाते याचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ऑनलाईन चॅटिंग इत्यादी कार्य केले जाते.
वेब कॅमेरा चा वापर हा आज-काल खूप मोठ्या प्रमाणात होतो ऑनलाइन शिक्षण घेताना किंवा व्हिडिओ कॉल करताना ऑनलाईन मीटिंग घेताना वेब कॅमेरा ची गरज असते . वेब कॅमेरा दोन पद्धतीचे असू शकतात एक इनबिल्ट वेब कॅमेरा आणि एक्स्टर्नल वेब कॅमेरा, लॅपटॉप स्क्रीन वरती वेब कॅमेरा हा इनबिल्ड असू शकतो पण काही ठिकाणी कम्प्युटरला जोडण्यासाठी आपल्याला USB चा वापर करून वेब कॅमेरा हा कनेक्ट करावा लागतो. वेब कॅमेरामुळे जगामध्ये संवाद सांगणे सोप्या व जलद झालेले आहे.