What is computer keyboard? Complete information in Marathi

What is computer keyboard ?

              संगणक की-बोर्ड म्हणजे काय ? संपूर्ण माहिती मराठीत What is computer keyboard?Complete information in Marathi संगणकामध्ये इनपुट करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे डिवाइस म्हणजे कीबोर्ड आहे, अंक अक्षरे आणि विविध चिन्हाचा वापर हा कीबोर्डच्या सहाय्याने संगणका मध्ये केला जातो. कीबोर्ड हे इनपुट डिवाइस म्हणून कार्य करतो संगणकाला माहिती संगणकाच्या भाषेत रूपांतरण करण्यासाठी कीबोर्ड द्वारे इनपुट होत असते. कीबोर्ड वरील key संख्या वेगवेगळे असू शकते 101 किंवा 108  114 की बोर्ड वरती असतात ,  अलीकडे वायरलेस कीबोर्ड सुद्धा उपलब्ध झालेले आहेत.

                   “QWERTY” हे लेआउट सर्वाधिक वापरले जाणारे कीबोर्ड लेआउट आहे. आपण “QWERTY” नावे कीबोर्डच्या पहिल्या ओळीमध्ये आपण पाहू शकतो, कीबोर्ड चा वापर हा टायपिंग साठीच केला जातो असे नाही तर गेमिंग साठी प्रोग्रामिंग साठी व इतर सॉफ्टवेअर हँडल करण्यासाठी ही कीबोर्ड चा वापर केला जातो कीबोर्ड हे विविध प्रकारात दिसून येत आहेत मोठ्या आकारापासून ते छोट्याआकार पर्यंत कीबोर्ड बाजार मध्ये मिळतात, कीबोर्डची पण काही प्रकार असतात ट्रॅडिशनल कीबोर्ड ,लवचिक कीबोर्ड, वायरलेस कीबोर्ड, हे असे काही प्रकार आहेत, सर्वसाधारणपणे कीबोर्ड मध्ये 101 ते 114 पर्यंत keys दिलेल्या असतात.

What is computer keyboard ? Complete information in Marathi


कीबोर्ड :

कीबोर्ड हे सर्वात महत्त्वाचे इनपुट डिवाइस आहे. याद्वारे कम्प्युटरमध्ये माहिती भरली जाते. हे टाईपरायटर प्रमाणे काम करते. याद्वारे बऱ्याच प्रकारचे शब्द ,संख्या ,चिन्ह हे टाईप केले जाते.


अल्फाबेट :

या प्रकारामध्ये इंग्रजी शब्द किंवा अक्षर टाईप केले जाते. कोणत्याही अल्फाबेट बटनाला सिंगल प्रेस केल्यावर छोटे अक्षर (small letters) टाईप होते किंवा शिफ्ट बटन प्रेस करून देखील मोठे अक्षर (Capital letters) टाईप केले जाते.


नंबर :

अल्फाबेट बटनांच्या वरती ज्या पंक्ती किंवा ओळी असतात तिथे नंबर बटन असतात.या बटनांमध्ये 0 ते 9 पर्यंत अंक टाईप केले जाते. नंबर टाईप करण्यासाठी कीबोर्ड मध्ये एक वेगळा सेट देखील असतो ज्याला न्यूमरिक कीपॅड असे म्हणतात.


Escape keys :

याचा वापर काही प्रोग्राम मधून बाहेर पडण्यासाठी केला जातो.


फंक्शन्स :

F1  ते  F12 पर्यंत च्या बटनांना फंक्शन्स बटन असे म्हणतात याचा वापर कम्प्युटरमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी केला जातो. कंप्यूटर मध्ये जे प्रोग्राम असतात त्याच्यावर आधारित याचा वापर केला जातो.


कर्सर कंट्रोल की :

या बटनांवरती Arrow चिन्ह असतात. याचा वापर करून डेस्कटॉप वरती नेऊ शकतो. कोणत्याही एका बटनाला क्लिक केल्यावर त्या कर्सल वरती असणारे arrow ची दिशा ही एक स्थान पुढे नेली जाते .जसे की, down/up बटन दाबल्यावर कर्सर एक लाईन खाली किंवा पुढे जाऊ शकतो. right/left बटन दाबल्यावर कर्सर एक लाईन डाव्या आणि पुढे जाऊ शकतो.


संख्यात्मक की-पॅड :

संख्यात्मक की-पॅड हे कीबोर्डच्या डाव्या भागात असणारे एक विशिष्ट समूह असतो ज्याने केवळ न्यूमरिक डेटा तयार केला जातो. याचे स्वरूप प एक साधारण इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर प्रमाणे असते आपण कम्प्युटरमध्ये जो काही डेटा अपलोड करत राहतो त्याच्या जवळपास 90% डेटा न्यूमरिक असतो. न्यूमरिक डेटा तयार करण्यासाठी एक कीपॅड असतो. याने केवळ आपण एका हाताने न्यूमरिक डेटा टाईप करू शकतो याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी Num लॉक बटन ऑन करायला हवे.


Control Key :

या पटनांचा वापर काही विशिष्ट आदेश देण्यासाठी इतर बटनांसोबत संयुक्त रूप मध्ये केला जातो. Ex:- विंडोज मध्ये कंट्रोल (ctrl)+c दाबल्यावर सिलेक्ट केलेले वाक्य कॉपी होते कंट्रोल बटनचा वापर अशा प्रकारे वेगवेगळ्या शॉर्टकट आदेश देण्यासाठी केला जातो.


Alt keys :-

या बटनांचा वापर देखील कंट्रोल बटनांप्रमाणे शॉर्टकट आदेश देण्यासाठी केला जातो.


Enter keys :-

याचा वापर आपण दिलेली माहिती कम्प्युटरमध्ये पाठवण्यासाठी केला जातो. MS-DOS मध्ये एंटर बटन दाबल्यावर आदेश कम्प्युटरला पाठवण्यात येतो विंडोज  मध्ये सिलेक्ट केलेले वाक्य हे आयकॉन मध्ये सक्रिय करण्यासाठी कार्य करतात याचा वापर डॉक्युमेंट्स तयार करताना पॅरेग्राफ सुरू करण्यासाठी केला जातो.


Shift keys :-

या बटनाचा वापर अक्षरांना मोठे करण्यासाठी केला जातो. जर एका बटनांवर दोन चिन्ह असतील तर शेफ बटन दाबून आपण वरचे चिन्ह टाईप करू शकतो कीबोर्ड वर दोन शिफ्ट बटन असतात


Back space keys :-

हे बटन प्रेस केल्यावर कर्सलने डाव्या बाजूचे वाक्य डिलीट करू शकतो.


Caps lock keys :-

या बटनाला ऍक्टिव्हेट केल्यावर अप्पर केस लोवर केस मध्ये तसेच लोवर केस अप्पर केस मध्ये टाईप केले जाते.


Other keys :-

वरती सांगितल्याप्रमाणे कीबोर्ड मध्ये इतर देखील बटन्स असतात जसे की, Pause, break,print, screen,scroll lock याचा वापर विशिष्ट कार्य करण्यासाठी केला जातो.

                     अशाप्रकारे आज आपण या लेखामध्ये संगणकचा कीबोर्ड कशा पद्धतीने वापरला जातो, त्यामध्ये कोण कोणत्या पद्धतीची keys असतात व त्याचा वापर काय आहे हे सविस्तर पाहिले. कीबोर्ड हा संगणकाचा सर्वात महत्त्वाचा इनपुट डिव्हाइस आहे आणि त्याचा वापर आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे कीबोर्डचा वापर करून त्यावरती शॉर्टकट कीस वापरले तर संगणकावर आपले काम अजून जलद गतीने होईल. 

 

Leave a Comment

error: Content is protected !!