या लेखात आपण ‘एक्सेल’ म्हणजे काय(what is Excel in Marathi) ते पाहणार आहोत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले हे एक सॉफ्टवेअर आहे. एक्सेलचे प्रमुख कार्य म्हणजे डेटा साठवणे, दिलेल्या माहितीचे गणिती आकलन करणे, ती माहिती व्यवस्थितरीत्या समजून घेणे, तसेच दिलेल्या माहितीची तुलना करणे. एक्सेल मध्ये आपण विविध प्रकारचा डेटा किंवा माहिती साठवू शकतो, जसे की विद्यार्थ्यांची मार्कशीट तयार करणे, कामगारांचे वेतन पत्रक तयार करणे, रिपोर्ट बनवणे, अकाउंटिंग स्टेटमेंट तयार करणे. हे सर्व कार्य आपण एक्सेल मध्ये सहज करू शकतो. तसेच, कोणत्या व्यवसायात किती नफा झाला किंवा तोटा झाला याचे नोंद ठेवण्यासाठीसुद्धा एक्सेल अत्यंत उपयुक्त आहे.
नोकरीच्या दृष्टीने पाहता, एक्सेलचे महत्त्व खूप आहे. एक्सेलच्या कौशल्यामुळे व्यक्तींना विविध क्षेत्रांत नवी कामे मिळण्याच्या संधी अधिक असतात. एक्सेलमध्ये डेटा व्यवस्थित भरण्यासाठी विविध पदांसाठी नोकऱ्या उपलब्ध असतात. जसे की डेटा एंट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट यांसारख्या विविध पदांवर नोकरी मिळण्याची शक्यता असते. मोठ्या कंपन्यांमध्ये डेटा एंट्री आणि व्यवस्थापनासाठी एक्सेलला मोठे महत्त्व आहे. चला, एक्सेल कसे कार्य करते आणि त्याची रचना कशी असते हे जाणून घेऊया.
Excel म्हणजे काय ? | what is Excel in Marathi
एक्सेलमध्ये स्तंभ (columns) आणि पंक्ती (rows) असतात. या दोन्हींच्या एकत्रित तयार होणाऱ्या घटकाला आपण “सेल” (cell) म्हणतो. या सेल मध्ये आपण आवश्यक माहिती, म्हणजेच डेटा, भरू शकतो.तुम्हाला एक्सेल शिकायचे असेल तर ते सोपे आहे. परंतु, जर तुम्हाला त्यामध्ये प्रगत पातळीचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी विशेष अभ्यास करावा लागतो. बरेच लोक कार्यालयीन कामांसाठी एक्सेलचा प्राथमिक वापर करतात, परंतु त्यांना प्रगत एक्सेलचे ज्ञान नसेल, तर काम करताना अनेक ठिकाणी अडचणी येतात. उदाहरणार्थ, डेटा विश्लेषण करणे, कंडिशनल फॉरमॅटिंग करणे इत्यादी कामे करताना अडचण येतात.
जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला एक्सेलचे ज्ञान आवश्यक आहे. एक्सेलमध्ये आपण डेटा बनवतो किंवा माहिती भरतो, तेव्हा विविध चार्ट्स आणि ग्राफ्सचा वापर केला जातो. यामुळे प्रेझेंटेशन अधिक प्रभावी दिसते आणि ग्राहकांना ते व्यवस्थितपणे समजावून सांगता येते.
एखाद्या व्यक्तीस परत परत एकाच प्रकारचे काम करायचे असल्यास, एक्सेलमधील VBA (Visual Basic for Application) चा वापर करू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीला एकच काम पुन्हा पुन्हा करायची गरज पडत नाही. कंपन्यांना असे कर्मचारी हवे असतात, जे कमी वेळेत अधिक कार्य करू शकतात. त्यामुळे या ॲप्लिकेशनचा एक्सेलमध्ये मोठा फायदा होतो.
MS- Excel कसे सुरु करावे :
“मायक्रोसॉफ्ट एक्सेल” ओपन करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. चला पाहूया:
- प्रथम “स्टार्ट” बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर “ऑल प्रोग्रॅम” यादी उघडेल.
- या यादीत “मायक्रोसॉफ्ट एक्सेल” हे ॲप्लिकेशन दिसेल; त्यावर क्लिक करा.
- ॲप्लिकेशन उघडल्यावर, “न्यू” या पर्यायाखालील “ब्लँक वर्कबुक” वर क्लिक करा.
- नवीन वर्कशीट उघडली जाईल.
याशिवाय, आणखी काही सोप्या पद्धतीने एक्सेल उघडता येईल:
- “टास्कबार” वरील “सर्च” बटणावर क्लिक करा.
- त्याठिकाणी “एक्सेल” टाइप करा.
- तुम्हाला एक्सेल ॲप्लिकेशन दिसेल; त्यावर क्लिक करा.
या पद्धती वापरून, तुम्ही सहजपणे मायक्रोसॉफ्ट एक्सेल उघडू शकता.
एक्सेल ॲप्लिकेशनचा लेआउट कसा असतो ?
एक्सेल उघडल्यानंतर प्रथम आपल्याला वर्कशीट दिसते. त्या वर्कशीटवर टेबलच्या स्वरूपात माहिती भरण्यासाठी टेबल फॉरमॅटमध्ये उभे आणि आडवे रकाने असतात.या उभ्या रकान्याला “Columns” म्हणतात, तर आडव्या रकान्याला “Rows” असे म्हणतात.
एका वर्कशीटमध्ये १६,३८४ स्तंभ आणि १०,४८,५७६ ओळी असतात. प्रत्येक Column ला एक विशेष नाव (स्तंभ शीर्षक) दिलेले असते, जसे की A, B, C, D… आणि प्रत्येक Row ला एक क्रमांक दिला जातो, जसे की १, २, ३, ४..
या सीटमध्ये एक Rows आणि एक Columns मिळून एक चौकोन तयार होतो, आणि त्या चौकोनाला “सेल” असे म्हटले जाते. प्रत्येक सेलसाठी एक विशेष नाव दिलेले असते. ज्या Rows आणि Columns मिळून चौकोन तयार होतो, त्याचे नाव त्या Column चे आणि Row चे क्रमांक वापरून तयार केले जाते. उदाहरणार्थ, E5.
MENU BAR | Ribbon :
EXCEL च्या वरील बाजूस मेनू बार असतो त्याला रिबन असे म्हणतात त्यामध्ये वेगवेगळे टॅबस् असतात. फाईल होऊन इन्सर्ट पेज लेआउट व्ह्यू दिसतात. होम टॅब चा वापर आपण फॉरमॅटिंग करण्यासाठी करतो पेज लेआउटचा वापर आपण पेज सेटअप करण्यासाठी करतो एखादे टूल्स ऍड करायचा असेल तर आपण इन्सर्ट चा वापर करतो अशा पद्धतीने या मेनू बाचा वापर आपण करत असतो.
फॉर्मुला बार | FORMULA BAR
फॉर्मुला बारचा वापर ऍक्टिव्ह सेलमधील व्हॅल्यू पाहण्यासाठी केला जातो. यामध्ये आपल्याला गणिती फॉर्मुले देखील पाहता येतात, तसेच त्याचे रिझल्टसुद्धा दिसतात. एखाद्या सेलला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये फॉर्मुला आहे का नाही, हे आपल्याला फॉर्मुला बारमध्ये पाहता येते.
स्टेटस बार | Status bar
एक्सेलच्या वर्कशीटच्या खालील बाजूस एक स्टेटस बार असतो, ज्याच्या वर निवडलेले पर्याय जसे की बेरीज, सरासरी, काउंट इत्यादी दिसतात.
शीट टॅब्स |Sheet Tabs
प्रत्येक वर्कबुकसाठी एक वेगळा टॅब असतो. प्रत्येक वर्कशीट तयार करताना त्याचे नाव व रंग बदलता येतो. नवीन वर्कशीट तयार करण्यासाठी “+” चिन्हावर क्लिक करावे लागते.
स्क्रोल बार |scroll bar
वर्कशीट मोठ्या असतात, कॉलम्स आणि रोस वापरून जर टेबल मोठं तयार केलं असेल, तर डावीकडून उजवीकडे त्याला हलवण्यासाठी आपल्याला याचा वापर करावा लागतो.
झूम | ZOOM
झूम वर्कशीटमध्ये अक्षरे आणि अंक आकाराने मोठे आणि लहान करून वाचण्यासाठी सोपे करण्यासाठी याचा वापर केला जातो.”
Excel म्हणजे काय? | what is Excel in Marathi “एक्सेल शिकण्याची सुरवात करा! खालील व्हिडिओ पाहा आणि आपला अभ्यास सुरू करा.”
या लेखात आपण ‘एक्सेल’ म्हणजे काय (what is excel) असते आणि ते वापरावे याबद्दल माहिती पाहिली. मला आशा आहे की तुम्हाला संगणकांच्या विविध प्रकारांविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. लवकरच नव्या विषयासह भेटू, धन्यवाद !
जर या लेखासंबंधी काही अडचणी किंवा शंका असतील, तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावे. तुमच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. हा लेख तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमचे मत कमेंटद्वारे कळवायला विसरू नका !