What is computer memory in Marathi | संगणक मेमरी

What is computer memory in marathi | संगणक मेमरी

What is computer memory in marathi | आज आपण संगणकातील मेमरी म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. संगणकासाठी मेमरी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. RAM, हार्ड डिस्क यासारख्या मेमरी डिव्हाईसचा वापर मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्यासाठी आणि प्रक्रियेतील माहिती तात्पुरती ठेवण्यासाठी केला जातो. चला तर मग, आता आपण विविध प्रकारच्या मेमरी डिव्हाईस बद्दल अधिक माहिती घेऊ आणि ते कोणत्या पद्धतीने कार्य करतात हे समजून घेऊया. 

What is computer memory in marathi  

What is computer memory in marathi

                  

Floppy disk

फ्लॉपी डिस्क हे एक वर्तुळाकार डिस्कवर असते जे दोन्ही बाजूंनी एक चुंबकीय पदार्थ आणि चिटकवलेले असते जे एक प्लास्टिकच्या चौकोनी कव्हर मध्ये सुरक्षित राहत असते. फ्लॉपी डिस्क म्हणजे काय ….तर एक प्रकारचं स्टोरेज ठेवायचं असतं जे अगोदरच्या काळामध्ये डेटा पाठवण्यासाठी वापरले जायचे.

फ्लॉपी डिस्क ची सुरुवात 1970 मध्ये झाली. सर्वात अगोदर फ्लॉपी डिस्क आली ती ८ इंचाची. नंतर हळूहळू त्याचा आकार कमी होत गेला आणि 5.25 इंचाची आणि सर्वात शेवटी तीन ३.२५ इंचाची फ्लोपी डिस्क लोकप्रिय झाली. डेटा साठविण्याची क्षमता या फ्लॉपी मध्ये खूप कमी प्रमाणात असते साधारणपणे डेटा साठवण्याची क्षमता यामध्ये १.४४ एमबी एवढी असते. अगोदरच्या काळात डेटा ट्रान्सफर करणं व साठवण हे सोपं नव्हतं फ्लॉपी टॅक्स मधील डेटा खूप लवकर खराब होण्याची शक्यता असते.

तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यानंतर बाजारात विविध प्रकारचे पेन ड्राईव्ह हार्ड ड्राईव्ह हे डिवाइस आले त्यामुळे प्रॉपर्टी एक्सला या डिवाइसने बाजूला केलं आजच्या काळात बघायला गेलं तर फ्लॉपी डिक्सचा खूप कमी प्रमाणात बघायला मिळते शक्यतो जे जुन्या पद्धतीचे संगणक आहेत त्यामध्येच ही फ्लॉपी डिस्क बघायला मिळते.

हार्ड डिस्क

हार्ड डिक्सला फिक्स डिस्क असे देखील म्हटले जाते.हे विविध आकरांमध्ये आणि क्षमतांमध्ये उपलब्ध असते.हार्ड डिस्क ही संगणकामध्ये सर्वात महत्त्वाचे डिस्क मानली जाते. कारण या डिक्समध्ये संगणकातील सर्व डेटा साठवण्याची क्षमता असते. आपल्या फाईल्स फोटो व्हिडिओ वेगवेगळे प्रकारचे सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम हे साठविले जाते.

हार्ड डिस्क कशी असते तर ती एका बंद डब्यासारखी असते ज्यामध्ये छोटे छोटे गोल प्लेट्स असतात आणि या प्लेटवर जो डेटा असतो तो चुंबकीय पद्धतीने साठवलेला असतो म्हणजेच आपण संगणकामध्ये ज्यावेळी एखादी फाईल सेव्ह करत असतो तेव्हा ती या प्लेटवर अगदी सुरक्षितपणे सेव झालेली असते

आधुनिक काळामध्ये ज्या हार्ड डिस्क आहेत त्यांचे डेटा साठवण्याची क्षमता ही 200 एवढी आहे . पर्सनल संगणकामध्ये एक विशिष्ट प्रकारचे हार्दिक देखील उपलब्ध झालेले आहे ज्यांना विंचेस्टर डिक्स असे म्हणतात याची क्षमता सांगायची झाली तर वीस एका बाईट ते ८० गिका फाईट एवढी असते.

HDD (hard Disk Drive)

ही हार्ड डिस्क पारंपारिक पद्धतीची मांडली जाते ज्यामध्ये ज्या प्लेट्स असतात त्या फिरतात. ही हार्ड डिस्क खूप जास्त प्रमाणात वापरली जाते कारण ती स्वस्त आणि विश्वासार्ह आहे परंतु ती खूप कमी गतीने काम करते कारण यामध्ये ज्या प्लेट्स फिरतात त्या भागांमुळे फाईल उघडायला आणि सेव करायला थोडा वेळ लागत असतो.

SSD

आधुनिक काळामध्ये जी हार्ड डिस्क प्रचलित झाली ती हार्ड डिस्क SSD म्हणून प्रचलित आहे ही एक नवीन प्रकारची हार्ड डिस्क आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फिरणाऱ्या प्लेट्स नसतात यामुळेही खूप जास्त वेगाने काम करते जो डेटा आपण संगणकामध्ये सेव करत असतो किंवा साठवत असतो तो SSD मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठविला जातो. त्यामुळे या हार्ड डिस्कवर खूप जास्त प्रमाणात लोड येऊ शकतो आणि त्यामुळे संगणकाचा काम करण्याचा स्पीड हा स्लो होऊ शकतो. थोडक्यात काय तर हार्ड डिस्क ही संगणकाचा मुख्य स्टोरेज मानली जाते जी डेटा सुरक्षितपणे साठवते आणि संगणकाला व्यवस्थितपणे काम करायला मदत करत असते.

Memory stick

एक प्रकारचे मेमरी कार्ड असते हे एक USB वर आधारित मेमरी ड्राईव्ह असते याचा आकार सांगायचा झाला तर 50.0 ×21.5×2.8 मिमी असतो. याची क्षमता ४ मेगाबाईट ते २५ गिगाबाइट एवढी असते. एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी केला जात असतो मेमरी स्टिक म्हणजेच पेन ड्राईव्ह किंवा USB स्टिक हे एक लहान आणि पोर्टेबल डिव्हाइस आहे. पेन ड्राईव्ह हे डेटा ट्रांसफर करण्यासाठीं खूप सोईस्कर आहे कारण त्यांना संगणक किंव्हा लॅपटॉपच्या USB पोर्टमध्ये लावून डेटा सेव्ह किंव्हा ट्रान्सफर केला जातो.

मेमरी स्टिक ही कशा पद्धतीने काम करते याची माहिती आपण पाहूया.

मेमरी स्टिक मध्ये जे तंत्रज्ञान वापरले जाते ते म्हणजे फ्लॅश मेमरी. यामध्ये कोणत्याही प्रकारचे फिरणारे पार्ट्स नसतात त्यामुळे हे हार्ड डिस्क पेक्षा टिकाऊ असते. USB पोर्टमध्ये टाकल्यानंतर आपण डेटा लगेच ट्रान्सफर करू शकतो.

मेमरी स्टिक मध्ये एकच प्रकारचा डेटा साठविण्याची क्षमता नसते तर यामध्ये विविध पद्धतीचा डेटा आपण सेव्ह करून ठेवू शकतो. जसे की,4GB ,8GB, 16GB, 32GB,64GB किंव्हा 128GB पर्यंत. हे आपल्याला आपल्या गरजेनुसार निवडता येते. जर आपल्याला जास्त प्रमाणात डेटा साठवायचं असेल तर आपण जास्त क्षमतेची स्टिक चा वापर करू शकतो.
पाहायला गेलं तर ही हलकी असते व खूपच लहान असते त्यामुळे आपण तिला सहजरीत्या कुठेही नेऊ शकतो. मेमरी स्टिक हे वापरायला अत्यंत सोप्या पद्धतीने वापरू शकतो व यामध्ये डेटा युएसपी कोर्ट मध्ये लगेच ट्रान्सफर करू शकतो त्यामुळे त्याला इथं गरज पडत नाही. यामध्ये कुठलेही फिरणारे पार्ट्स नसल्यामुळे ही जास्त टिकाऊ असते. मेमरी स्टिक हे आपण सर्वत्र वापरू शकतो संगणक लॅपटॉप टीव्ही कार म्युझिक सिस्टीम मध्ये याचा वापर आपण करू शकतो.

मेमरी स्टिक ही कधी वापरायची तर जर तुम्हाला ऑफिसमधल्या काही फाईल तुम्हाला घरी न्यायच्या असतील किंवा त्या इतरत्र शेअर करायचे असतील म्हणजेच ट्रान्सफर करायचे असतील तेव्हा आपण पेन ड्राईव्हचा मदत करू शकतो. एखाद्या वेळेस आपल्याला मोठ्या मोठ्या फाईल चे फोटोचे बॅकअप घ्यायचे असतील तेव्हा मेमरी स्टिक ही आपल्याला सोयीस्कर ठरते.

इनपुट डिव्हाइस  बद्दल अधिक माहिती वाचा : what-is-input-devices

Compact disk -CD

ही एक विशिष्ट प्रकारची डिस्क असते. कॉम्पॅक्ट डिस्क ही एक गोलाकार प्लास्टिक आणि मॅटर ना बनवलेला डिस्क असतं ज्यामध्ये आपण विविध प्रकारचे सॉफ्टवेअर व्हिडिओज संकेत किंवा आपल्या इतर डेटा साठवू शकतो. CD चा सर्वात जास्त वापर हा 1980 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता आणि तेव्हा म्युझिक आणि सिनेमा बघण्यासाठी CD हे माध्यम होतं.
कॉम्पॅक्ट डिस्क ही पातळ तुकड्यापासून बनवलेली असते ज्याच्या वरती एक पातळ हॉटेलचा थर असतो या मेटलच्या थरावर लहान लहान खाचा असतात. जेव्हा सीडी प्लेयर मध्ये ही सीडी घातली जाते तेव्हा एक लेझर या खाच्याच्या भागावरून डेटा वाचतो आणि त्यानुसार ते संगीत व्हिडिओ आपण प्ले करू शकतो. यामुळे यांना ऑप्टिकल डिस्क असे देखील म्हटले जाते. CD ची क्षमता ही 680 मेगा वाईट ते 800 मेगा बाईट एवढी असते. १२०० किलो बाईट प्रति सेकंड या गतीने वास्तु जाऊ शकते. या सूचना वाचण्यासाठी ज्या ड्रायव्हरचा वापर केला जातो त्याला CD रोम ड्राईव्ह असे म्हटले जाते.
अशा प्रकारच्या कॉम्पॅक्ट डिस्क देखील उपलब्ध आहेत ज्यावर आपण साधारण पद्धतीचा डेटा लिहू किंवा वाचू शकतो. पण त्यासाठी CD writer ची आवश्यकता असते. साधारणतः ही महागडी असल्यामुळे याचा वापर सिमित असतो त्यामुळे जास्त प्रमाणात कॉम्पॅक्टचाच वापर करण्यात येतो. आजकाल जे प्रोग्राम असतात ते शक्यतो सीडी वरच उपलब्ध झालेले असते असते. याला मुख्यतः तीन भागांमध्ये वर्गीकरण करता येत.
१.CD -ROM
२.CD -R
३.CD -RW

DVD(digital video disc)

DVD ही एक प्रकारची डिस्क असते जे शिडी सारखेच दिसते पण त्यामध्ये डेटा खूप मोठ्या प्रमाणात साठवला जाऊ शकतो याची डेटा साठवण्याची क्षमता दोन गीगापाईट पेक्षा अधिक असते यामध्ये डेटा लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची ड्राय असते ज्याला डीव्हीडी असे म्हटले जाते. मुख्यतः वापर सिनेमे व्हिडिओ गेम्स आणि मोठमोठ्या फाईल साठवण्यासाठी केल्या जातात चांगल्या पद्धतीने व्हिडिओ आणि डेटा साठविता येतो. सीडीच्या आकारासारखाच असतो पण याची क्षमता त्यापेक्षा अधिक असते DVD-ROM मध्ये डेटा फक्त वाचला जाऊ शकतो तो आपण लिहू शकत नाही. DVD -R मध्ये डेटा फक्त एका वेळेस रेकॉर्ड करू शकतो आणि त्यानंतर एक DVD -ROM कार्यरत असते.DVD -RAM मध्ये डेटा आपण खूप वेळेस रेकॉर्ड करू शकतो आणि तो डिलीट देखील करू शकतो.

DVD हे कसं काम करतं व त्याचे प्रकार काय काय आहे याची माहिती आपण आता पाहूया.

डीव्हीडी मध्ये डेटा हा ऑप्टिकल पद्धतीने साठविला जातो चुंबकीय पद्धतीने नाही. ड्राइव्ह डिक्समधील डेटा वाचण्यासाठी लेझर चा वापर केला जातो. सीडीच्या तुलनेत डीव्हीडी मध्ये डेटा हा खूप मोठ्या प्रमाणात साठविला जातो कारण CD मध्ये त्यात असणाऱ्या खाचा आणि सपाट भाग हे खूप मोठे असतात तर DVD मध्ये खूप लहान खात असतात त्यामुळे त्यामध्ये जास्त माहिती साठविली जाते

CD मध्ये फक्त ७०० MB पर्यंत डेटा साठविता येतो तर DVD मध्ये तोच डेटा साठवण्याची क्षमता 4.7 जीबी एवढी असते. काही ड्यूयल लेअर डीव्हीडी मध्ये 8.5 पर्यंत डेटा साठविण्याचे क्षमता असते. सांगायचे झाले तर यामध्ये डेटा साठविण्याची क्षमता अधिक असते त्याची क्वालिटी चांगली असते व ही आकाराने लहान व हलके असल्यामुळे ते आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. जसे याचे फायदे आहेत तसेच याचे काही तोटे हि आहेत ते म्हणजे आजकालच लॅपटॉप किंवा संगणकामध्ये डीव्हीडीच प्रमाण खूप कमी झाला आहे म्हणजेच डीव्हीडी वापरणं कमी झाला आहे कारण त्याला स्क्रॅच पडण्याची क्षमता खूप जास्त असते कारण क्रॅश पडल्यावर त्यातील डेटा वाचायला आणि प्ले करायला शक्य होत नाही .आजकाल लोक जास्त प्रमाणात पेन ड्राईव्ह सारखी साधने वापरायला लागली आहे कारण ते त्यांना जास्त सोयीस्कर वाटते.

(Blue -ray disk -BD)

ब्लू रे डिस्क हे उच्च क्षमतेच स्टोरेज माध्यम आहे ब्लू रे डिस्क ला बिडी असे संक्षिप्त नाव देखिल देण्यात आलेले आहे. ब्लू रे डीस्क चा वापर हा अलीकडच्या काळातील आहे म्हणजेच हे डीव्हीडीनंतर ते विकसित झालेले तंत्रज्ञान आहे.CD आणि DVD पेक्षा यामध्ये डेटा खूप मोठ्या प्रमाणात पाठवला जातो व त्याची क्षमता देखील त्यांच्या तुलनेत अधिक असते. ब्लू रे असे नाव पाडण्याचे याचे कारण असे आहे की यामध्ये ब्लू रंगाच्या लेझरचा वापर केला जातो जो नेहमी रेट लेझर पेक्षा बारीक असतो आणि त्यामुळे यामध्ये डेटा जास्त प्रमाणात साठविला जातो.

ब्लू रे डिस्कची क्षमता ही 25 जीबी किंवा50GB एवढी असते. तुलना करायची झाली तर DVD मध्ये ती फक्त 4.7 जीबी एवढी असते. याचे फायदे असे आहे की यामध्ये जास्त प्रमाणात डेटा साठविण्याची क्षमता आहे त्याची असणारी उच्च क्वालिटी व त्याचा टिकाऊ पणा हे झाले याचे फायदे याच पद्धतीने याची काही तोटे देखील आहे ते म्हणजे हे खूप महागडे उपकरण आहे याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो व आजकालच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे हे मागे पडलेले आहे.

PEN/THUMB/FLASH drive

फ्लॅश मेमरी डेटा स्टोरेज डिवाइस आहे. ज्यामध्ये USB (univarsal sirial bus) १.१ किव्हा २.० इंटरपै नल मध्ये समाविष्ट आहे. पेन ड्राईव्ह , thumb drive, व फ्लॅश फ्लॅश ड्राईव्ह हे एकाच प्रकारचे डिवाइस आहे त्याचा वापर हा डेटा साठविण्यासाठी होतो आणि एका संगणकात होऊन दुसऱ्या संगणकामध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो .हे एक छोटं आणि USB पोर्ट मध्ये लावून वापरण्यात येणारा स्टोरेज डिवाइस आहे. जे वापरण्यास खूप सोपे आहे.

पेन ड्राईव्ह मध्ये फ्लॅश मेमरी असते त्यामध्ये डेटा साठविला जातो ही फ्लॅश मेमरी म्हणजे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक स्टोरेज आहे ज्यामधे कोणतेही फिरणारे भाग नसतात त्यामुळे पेन ड्राईव्ह हे जास्त टिकाऊ व जगात असते. पेन ड्राईव्ह हे तुम्ही संगणकाच्या USB पोर्ट मध्ये लावतात आपण त्यामधील फाईल्स किंवा डेटा हा ट्रान्सफर करू शकतो. पेन ड्राइव ची क्षमता ही विविध प्रकारची बघायला मिळते.

4 GB पासून ते 128 GB किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे पेन ड्राईव्ह आपल्याला बाजारामध्ये सहजरीत्या मिळतात. थोडक्यात सांगायचे झाले तर पेन ड्राईव्ह/thumb drive/फ्लॅश ड्राईव्ह हे अत्यंत लहान पण उपयुक्त स्टोरेज डिवाइस आहे ते डेटा साठविण्यासाठी व ट्रान्सफर करण्यासाठी आपण वापरू शकतो आजकालच्या जगात व तंत्रज्ञानामध्ये हे खूपच लोकप्रिय झालेले आहे.

Magnetic Tape

मॅग्नेटिक टेप ला चुंबकीय टेप देखील म्हटले जाते. मॅग्नेटिक टाईप म्हणजे डेटा साठविण्याचे हे जुन्या तंत्रज्ञान ओळखला जातो त्याचा वापर शक्यतो १९७० ते ८० च्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात केला जायचा याचा विशेषतः वापर च्या बॅकअप आणि मोठ्या संस्थांमध्ये डेटा संग्रहित करण्यासाठी केला जायचा. मॅग्नेटिक टेप मध्ये डेटा साठविण्यासाठी मॅग्नेटिक हेड वापरला जातो. जो टेपवर डेटा लिहितो आणि वाचतो देखील.

मॅग्नेटिक टेप मध्ये डेटा खूप मोठ्या प्रमाणात साठविता येतो तसेच हे स्वस्त असतात व हे आणि वर्षापर्यंत टिकून देखील राहतात. आजच्या काळात हार्ट डिस्क व SSD या तंत्रज्ञानामुळे मॅग्नेटिक टेप ही मागे पडले आहे कारण नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त केल्या जाणाऱ्या वापर वापरायला सोपे व विश्वसनीय आहे पण अजूनही काही अशा संस्था आहेत ज्यामध्ये मॅग्नेटिक टेप चा वापर केला जातो.


                    या लेखात आपण संगणकाची मेमरी कशी असते, कशी कार्य करते, तसेच तिचे प्रकार कोणते आहेत हे तपशीलवार पाहिले. मला आशा आहे की तुम्हाला संगणक मेमरी या विषयाची संपूर्ण माहिती मिळाली असेल.
जर या लेखासंबंधी काही अडचणी किंवा शंका असतील, तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावे. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. हा लेख तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमचे मत कमेंटद्वारे कळवायला विसरू नका !
लवकरच नव्या विषयासह भेटू, धन्यवाद !

Leave a Comment

error: Content is protected !!