10वी मराठी – मागील प्रश्नपत्रिका व तयारी
मराठी हा विषय आपल्या रोजच्या बोलण्याचा आणि लिहिण्याचा पाया आहे.इयत्ता 10वीच्या परीक्षेत मराठीमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील, तर फक्त धडे पाठ करून चालत नाही.प्रश्न नीट समजून घेणे, उत्तर आपल्या शब्दांत लिहिता येणे आणि मुद्द्याला धरून लिहिणे हे खूप महत्त्वाचे असते.
योग्य लेखन, समजून वाचन आणि प्रश्नांचा सराव अत्यंत आवश्यक आहे.
मराठी विषयाचा अभ्यास कसा करावा?
इयत्ता 10वीची मराठी परीक्षा फक्त पाठांतरावर नसते.प्रश्न नीट समजून घेणे आणि उत्तर आपल्या शब्दांत लिहिता येणे हे जास्त महत्त्वाचे असते.त्यामुळे उत्तर लिहिताना थोडक्यात, स्पष्ट आणि मुद्द्याला धरून लिहायचा प्रयत्न करा.
मराठीमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील, तर मागील वर्षांचे Question Papers नक्की सोडवा. जुने पेपर्स सोडवल्यामुळे पेपर कसा येतो, कोणते प्रश्न जास्त विचारले जातात आणि उत्तर कसे लिहायचे हे समजायला मदत होते.
अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत वेळ कमी पडतो.याचे कारण म्हणजे वेळ लावून पेपर सोडवण्याचा सराव नसतो.म्हणून दररोज किंवा आठवड्यातून एक तरी पेपर ठराविक वेळेत सोडवण्याचा सराव करा.
मराठी विषयामध्ये लेखन खूप महत्त्वाचे आहे.निबंध, पत्रलेखन, संवाद लेखन यांचा थोडा थोडा रोज सराव केला,तर उत्तर लिहिणे सोपे जाते.नियमित सराव केल्यास मराठी विषय सोपा वाटतो आणि गुणही वाढतात.
📝 मराठी परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
- प्रश्नपत्रिका मिळाल्यावर आधी सगळे प्रश्न नीट वाचा.
- उत्तर लिहिण्याआधी थोडा विचार करा.
- उत्तर मुद्द्याला धरून लिहा.
- अपठित उतारा सोडवताना घाई करू नका.
- स्वच्छ आणि वाचनीय अक्षरात लिहा.
- व्याकरण प्रश्न नियम आठवूनच सोडवा.
- निबंध, पत्र, संवाद यांचा रोज थोडा सराव ठेवा.
- मागील वर्षांचे पेपर्स घड्याळ लावून सोडवा.
- आधी सोपे प्रश्न पूर्ण करा.
- वेळ उरला असेल तर उत्तर तपासून घ्या.
💡 टीप: नियमित सराव = चांगले गुण
| Paper | Details | Download |
|---|---|---|
|
Marathi – March 2025 Latest |
SSC Board (Maharashtra) Class 10 | Marathi Medium |
📥 Question Paper PDF |
| Marathi – March 2024 |
SSC Board (Maharashtra) Class 10 | Marathi Medium |
📥 Question Paper PDF |
| Marathi – March 2023 |
SSC Board (Maharashtra) Class 10 | Marathi Medium |
⏳ Coming Soon |
